अभिनव अकॅडमीमध्ये शिवजयंतनिमीत्त व्याख्यान

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): अभिनव अकॅडमी शाखेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि प्रेरणायुक्त वातावरणात साजरी करण्यात आली. या सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची आणि विचारांची शिदोरी देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून दत्तात्रय - भवर उपस्थित होते. आपल्या ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार केवळ पुस्तकात न ठेवता ते डोक्यात घेऊन कार्य करा. शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य आणि जिद्द अंगी बाळगल्यास जीवनात यश निश्चित मिळेल. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले श्री.
समाधान सोनवणे सर यांनी शिवकालीन इतिहासातील विविध पैलू उलगडून दाखवले. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि रसाळ भाषणामुळे उपस्थित विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते.

या मंगलप्रसंगी अभिनव अकॅडमीचे शुभम पालोदे आणि संभाजी पालोदे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच साक्षी शिंगारे, राधिका पालोदे, सोहम नवल यांच्यासह अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समरीन शेख यांनी अतिशय प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अकॅडमीच्या सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.